सचिवांचे मनोगत
नमस्कार, “धरूया तंत्रज्ञानाची कास, करूया समाजाचा विकास” हे सूत्र हाती धरून अखिल बुरुड समाज सेवाभावी संस्था संचालित अखिल महाराष्ट्र बुरुड समाज वधू वर सुचक समिती ही वर्ष २०१७ पासून समाजामध्ये अतिशय जोमाने कार्यरत आहे. आपल्या समाजातील काही कुटुंब हे अजूनही तुटपुंज्या रोजगारावर काम करणारा आढळून येतो. त्यांना आधुनिक जगाच्या कक्षेत आणणे हे एक आव्हान आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार करता आज आपल्या समाजामध्ये बरेचसे तरुण हे विज्ञान, फार्मसी, इंजिनियरिंग, मेडिकल, एमबीए, वाणिज्य, कलासारखे व्यावसायिक क्षेत्र निवडताना दिसतात. आपल्या समाजामध्ये होणारी ही शैक्षणिक क्रांती निश्चितपणे प्रशंसनीय आहे. त्यातून ते तंत्रज्ञानात प्रभावी बनतात हे वेगळे सांगायला नको. अश्या विविधांगी बाजूचा विचार करत समाजाची गरज ओळखून आणि समाजाला आजच्या तंत्रज्ञान क्रांतीसोबत प्रगतीशील करताना सदर “बुरुड बंधन” वेबसाईट आणि अप विनामूल्य स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. उपवर व उपवधू ह्यांची नोंदणी आणि माहिती घरबसल्या उपलब्ध करून देण हे या वेबसाईट आणि ॲप हा प्रमुख उद्देश असला तरीही त्यातून होणारी नोंदणी, विखुरलेला समाजाची गाव-तालुका-जिल्हा-क्षेत्रानुसार संख्या, समाजाची गरज, महत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहचवणे, आपत्कालीन परीस्थितीमध्ये समाजाबंधावाना लागणारी मदत अश्या विविधांगी बाजूंनी उपयोगात आणता येईल. आपल्या समाजाला स्वयंपूर्ण होण्यासाठी निश्चितपणे ह्याचा फायदा होईल ह्याची मला आणि आमच्या संस्थेला खात्री आहे. हे वेबसाईट आणि ॲप ह्यात वेळोवेळी लागणाऱ्या गरजेनुसार बदल करणे देखील गरजेचे आहे. तेव्हा त्यासाठी आपल्या योग्य व अपेक्षित सूचना स्वागतार्ह आहे. धन्यवाद.