समाजभूषण श्री चंद्रकांतजी खैरे
मा. खासदार, नेते – शिवसेना (उबाठा), छत्रपती संभाजीनगरनमस्कार संपूर्ण समाजासाठी आखिल महाराष्ट्र वधू वर सूचक समिती विनामूल्य काम करत आहे. त्यांनी एका छोट्याश्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष होत असतानाचे आपण सर्व साक्षीदार आहोच. आज ज्या वेळेला सामाजबांधवांसोबत संपर्क होतो तेव्हा ही संस्था जे कार्य सक्रियपने काम करते आहे त्याबद्दल आवर्जून ऐकायला मिळते. कुटुंब व्यवस्था सुदृढ व्हावी हयासाठी अश्या संस्था काम करतात याचा आनंद वाटतो. अतिशय गरीब व संघर्ष करणारा आपल्या बुरुड समाजाला जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी, आधुनिकतेकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. ह्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या app आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज आम्ही देखील एका मोबाईलच्या क्लीकद्वारे जोडले जात आहोत ही निश्चितपणे विशेष आनंदाची बाब आहे असे मला वाटते. उपवर आणि उपवधू ह्यांसाठीच नव्हे तर, इतर समाजबांधवांसाठी हा उपक्रम अतिशय लाभाचे ठरेल आणि समाज ह्यातून जोडला जाईल, मिळालेल्या माहितीच्या आधारे समाजविकासाला वृद्धिंगत करता येईल, असे मला वाटते. आपण सर्व ह्या उपक्रमाचे लाभार्थी होऊयात !!! आखिल महाराष्ट्र वधू वर सूचक समिती संस्थेचे खूप खूप अभिनंदन आणि ह्या aap आणि वेबसाईटला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.